न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी परवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केद्रापासून जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर क्र. २३ निगडी येथे येणारी मुख्य जलवाहिनीची गळती झाली असून, त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार दि. १९ / ०३ / २०२० रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
१९ / ०३ / २०२० रोजी म. न. पा. मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस -या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. २० / ०३ / २०२० रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याचा शक्यता आहे. नागरिकांनी म. न. पा. कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.















