न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- करोना विषाणूपासून प्रादुर्भाव टाळण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेने आपल्या सेवकांना संचालकाच्या हस्ते मास्क सोबत साबण व सॅनीटायझरचे वाटप केले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते, उपाध्यक्ष मनोज बोरसे, माजी अध्यक्ष नंदकुमार लांडे, संचालिका सुलोचना भोवरे, अॅड. घनशाम खलाटे, अॅड. बाळासाहेब थोपटे, सौ. सोनल लांडगे, गणेश पवळे, विजय गवारे, सौ. सविता मोहरुत, दिपक डोळस, सीए. अमेय दर्वे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष प्रा. सस्ते म्हणाले की, ‘कोरोना विषाणू ही जागतिक महामारी असुन, जागतिक आरोग्य संघटना, भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या मार्फत प्रत्येक नागरीकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनास प्रतिसाद देत, अण्णासाहेब मगर बँकेने आपल्या सर्व सेवकांना उपचारापेक्षा सावधगिरी महत्वाची या भावनेने सुरक्षा साहित्याचे वाटप केले आहे. प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही सस्ते यांनी यावेळी केले.















