न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत बेवारस वाहनांबाबत (दि. १७ / ३ / २०२० ते । ३१ / ३ / २०२०) या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर, फूटपाथवर व महानगरपालिकेच्या इतर मालमत्तांचे ठिकाणी सोडलेली बेवारस वाहने संबंधीत मालकांनी स्वत: हून हटवावीत. अन्यथा त्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलिस वाहतुक शाखा व प्रादेशिक परिवहन विभाग यांचे मार्फत संयुक्तपणे कार्यवाही करण्यात येईल.
ही कार्यवाही श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड मनपा, अजित पवार, अतिरिक्त आयक्त – २, निलिमा जाधव, सहा. पोलिस आयुक्त, वाहतूक, विनोद सगरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड व श्रीकांत सवणे, सह. शहर अभियंता, बीआरटीएम यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.















