न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि. १७/०३/२०२० पर्यंत एकुण ८० व्यक्तींचे करोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला असून उर्वरीत नऊ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
आज दि. १७/०३/२०२० रोजी करोना पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथून आर्यलँड येथे राहून दुबई मार्गे शहरात आलेला आहे. त्याच्या सहवासितांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज दि. १७/०३/२०२० अखेर एकुण १० करोना बाधित रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल आहेत.















