न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- श्रीसंत सेना महाराज वाल्हेकरवाडी नाभिक समाजाच्या वतीने दगडोबा चौकात गुरुवारी ( दि . १९ ) बैठक घेण्यात आली. बैठकीत करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दि. २० व २१ मार्चला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत तीन दिवस ( दि . १९ , २० व २१ मार्च) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याची अंमलबजावणी करत गुरुवारी परिसरातील ५५ दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पुढील दोन दिवस चिंचवडेनगर, दाडोबा चौक, चिंतामणी मंदिर, सायली कॉप्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भालके कॉलनी, रजनीगंधा सोसायटी, वाल्हेकरवाडी गावठाण, भोंडवे वस्ती परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
बैठकीला अध्यक्ष संदीप महाले, उपाध्यक्ष सादिक शेख, सचिव जितेंद्र चित्ते, खजिनदार वसंत ढवळे, अनिल सोनवणे यांच्यासह वाल्हेकरवाडीतील नाभिक बांधव उपस्थित होते.













