न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवडमधील एका २४ वर्षीय तरुणाला करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. संबंधित रुग्ण हा फिलिपिन्स येथून प्रवास करून आलेला आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात करोना बधितांचा आकडा हा १२ वर पोहोचला आहे. तर पुण्यात आणखी रुग्ण सापडल्यानं पुण्यातील आकडाही दहावर गेला आहे. या दोन्ही रुग्णांना क्वारेंटाइनमध्ये ठेवलं जाणार आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच फ्लूसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस घरांमध्येच होम ‘क्वॉरनटाईन’ करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.















