न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- कोरोनाला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. सोशल मीडियातून कोरोनाचे विनोद सुरु झालेले आहेत. सोशल मीडियातून अफवा पसरवल्या जात आहेत. पुणे आणि पिपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियात असाच पुणे, पिंपरी – चिंचवड परिसरात हवेता औषध फवारणीचा एक फेक मेसेज फिरवला जात असून, पोलिसात याबाबत तकार देण्यात आली आहे.
यामध्ये आज रात्री १० नंतर उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये. या काळात कोव्हीड – ०१ कीलच्या मृत्यूसाठी हवेत औषधाची फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. असाच मेसेज पिपरी – चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांच्या नावाने फिरत असल्याचे शुक्रवारी रात्री निदर्शनात आले त्यानंतर आयुक्तानी खात्री करून पोलिसांत तक्रार दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असून. रुग्णाची संख्या १२ वर पोहोचली आहे. कोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अनेक फेक संदेश पसरत असून, शुक्रवारी सायकाळी पिपरी – चिंचवडचे आयुक्त श्रावण हाडीकर यांच्या नावाने हा संदेश पसरविला गेला. याबाबत श्रावण हर्डीकर म्हणाले ‘असा कोणताही संदेश मी पोस्ट केला नाही. हा संदेश फेक, फसवा आहे. नागरिकाची दिशाभूल करणारा आहे. कोरोना संदर्भातील या संदेशाची माहिती पोलिसांना दिली आहे. चुकीचे संदेश पसरविण्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.















