न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शासन स्तरावर याबाबत विविध उपाययोजना व दक्षता घेण्यात येत आहे.
राज्यातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण पिंपरी – चिंचवड शहरात असल्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे शहरातील सामान्यांना बस वाहतूक सेवा देणारी पीएमपीएमएलने खबरदारी घेत प्रत्येक मार्गावर धावणाऱ्या बसची औषध फवारणी करून करोनाचा संग प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
भोसरी बस टर्मिनल येथून विविध मार्गांवर धावणाऱ्या ४० टक्के बस बंद केल्या आहेत. भोसरी बीआरटी स्थानकात २०० वाहक चालक यांना संतोष नामदेव सस्ते ( वाहक क्र. २९०३ ) यांनी डेटॉल व सॅनिटायझरचे वाटप करून, अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना स्वच्छता पाळण्याचे आदेश दिले. या वेळी आगार अभियंता हनुमंत पाटसुते, कंट्रोलर कम चेकर काळुराम लांडगे, राजाराम काळजे, दिनकर काळजे, सिकंदर मुलाणी, संजय हुलावळे, विश्वनाथ पवार, कर्मचारी उपस्थित होते.















