- पोलीस बांधवांच्या काळजीपोटी प्राधिकरण कृती समितीचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-१९ म्हणजेच कोरोना विषाणूमुळे बाधितांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. स्वतंत्र भारतामध्ये अशी आणीबाणीची अभूतपूर्व आणीबाणी पहिल्यांदाच देशाची करोडो जनता अनुभवत आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहर आणि मुंबई या तीनही मोठ्या शहरात सर्वात जास्त कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अश्याही परिस्थितीत मात्र पोलीस, डॉक्टर्स, आणि स्वच्छता व सफाई कामगार अहोरात्र रस्त्यावर शहरवासीयांची सेवा करीत आहेत.अश्या ” सुरक्षा दूतांना” मात्र दैनंदिन मूलभूत आहार सेवा – सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
याकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे “आरोग्य दूत” -” प्रथम- मदतनीस” एसपीओ यांनी सेवेसाठी शहरात मध्यरात्रीच्या कालावधीकरिता पुढाकार घेतला आहे. सदरचे सर्व स्वसंसेवक हे मध्यरात्री प्रत्येक चौकात जनतेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चहा व नाष्टा जागेवर पोहचते करीत आहे. प्रशासनाचे कायदेशीर नियम पाळून प्रत्येक चौकी अंतर्गत ४ स्वयंसेवक एस पी ओ – फर्स्ट एड रिस्पॉण्डर पिंपरी चिंचवड आयुक्तालय विभागाकरिता कार्यरत आहेत.
याकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना घाळी, विजय मुनोत, बाबासाहेब घाळी, जयेंद्र मकवाना, अँड.विद्या शिंदे,जयप्रकाश शिंदे, विशाल शेवाळे,अजय घाडी, सुरेश येरूनकर, सतीश मांडवे,विशाल शेवाळे,राजेश बाबर,तेजस सापरिया,अमित चौहान, संतोष चव्हाण, अमोल कानु,अमित डांगे,अमृत महाजनी,विशाल माने हे प्रमुख एस पी ओ विभागवार कार्यरत आहेत.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” कोविड – १९ म्हणजेच कोरोना विरुद्ध आता निर्णायक लढाई देशात सुरू झाली आहे, या विषाणू विरुद्ध महाराष्ट्र प्रशासन निकाराने लढा देत आहे. पोलिस प्रशासन सुद्धा रात्रंदिवस त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावत आहे. याकरता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे एस पी ओ सुद्धा प्रशासनाला आता मदत करीत आहेत. समितीचे सर्व “एस पी ओ” चें आपत्कालीन सेवेचे म्हणजेच फर्स्ट एड रिस्पॉण्डर चे वैदयकीय प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे, असे प्रशिक्षित अनुभवी एस पी ओ आता नागरिकांच्या सेवेकरिता तयार आहेत. त्यातच आता माननीय प्रधानमंत्री यांनी संपूर्ण देशात २१ दिवस “लॉक – डाउन” जाहीर केलेला आहे. सदरचा करर्फु कडकपणे पाळणे सर्व राज्यवासीयांचे कर्तव्य आहे. सर्वांनी सजग आणि सावध राहणे आवश्यक आहे.तरच कोरोनाचे संक्रमण वर्तुळ तुटेल.”













