न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२०) :- आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला राहत्या घरातून फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने मुलीला तळेगाव दाभाडे व शरदनगर चिंचवड येथील त्याच्या मित्रांच्या रूमवर नेऊन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
यावेळी अल्पवयीन मुलीने आरोपीला नकार दिला असता आरोपीने मुलीला मारहाण व शिवीगाळ केली. ही घटना २१ फेब्रुवारी ते २२ मार्च २०२० या कालावधीत अजंठानगर, कृष्णानगर चिंचवड, तळेगाव दाभाडे आणि शरदनगर चिंचवड येथे घडली.
विशाल लालू राठोड (वय २२, रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने निगडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २८) फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.












