न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२०) :- जमावबंदीचा आदेश धुडकावून सामुदायिक नमाज पठण करणाऱ्या ३८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी ( दि. २७ ) दुपारी एकच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडला. यातील १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
समिना सराईतुल्ला वारीसअलीम चौधरी, अकबाल हाकीबुल्ला खान ( वर्षे ५२) , सलीम झीनत चौधरी (वय ३२), महमद शकील महमद खलील चौधरी (वय ४६), कमल हयातुल्ला रहमाणी (वय ४८), शमशुद्दीन महमद इलाके खान ( वय ४५), नशीबउल्ला मंहमद जमा (वय ५८), अफजल अमीरउल्ला चौधरी (वय ३७), अहमद हुसेन समीउल्ला चौधरी (वय २८), मोहमद साकीर समीना सराईतुल्ला चौधरी ( वय १८ ), बिलाल महमद शकील चौधरी ( वय २० ), सोएल महमद शकील चौधरी ( वय २१) सर्व रा. संगम हाईटस, कुदळवाडी चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तसेच पळुन त गेलेल्या इतर २५ जणांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी संतोष सकपाळ यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने जमावबंदी तसेच संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा भंग करीत काहीजण चिखली – कुदळवाडी परिसरात असलेल्या एका ईमारतीच्या टेरेसवर नमाज पठण करण्यासाठी जमले होते. याबाबतची माहिती मिळाल्यावर चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत १३ जणांना अटक केली.












