स्टार आर्चर्स अकॅडमी तर्फे धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन,
११ऑगस्ट २०१८ रोजी स्टार आर्चर्स अकॅडमी तर्फे २ ऱ्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे
करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ५० हुन अधिक शाळेमधून १५० शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा ह्या शालेय खेळाडू इयत्ता १ली ते १२वी च्या खेळाडूंसाठी वेगवेगळ्या गटात घेण्यात आल्या होत्या, या वेळी महाराष्ट राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव श्री. प्रमोद चांदुरकर , प्रिंसिपल अमृता वोरा आणि रेशमा शेख , तसेच पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री उपस्थित होते,
अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजीत करून जास्तीत जास्त खेळाडूंना सहभाग मिळून राष्टीय व आंतरराष्टीय खेळाडू निर्माण करता येतील तसेच
पिंपरी चिंचवड शहरात धनुर्विद्या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यात मदत होईल, असे मत स्टार आर्चर्स अकॅडमी च्या संचालिका व आंतरराष्टीय
पदक विजेत्या सोनल बुंदेले यांनी व्यक्त केले.