न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- जगभरासह देशभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील ससून रूग्णालयात आज ४६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या महिलेचा करोना बाधित झाल्याचा रिपोर्ट आला होता. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४१६ झाली आहे. एकीकडे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. अशात पुण्यात आणखी एक बळी गेल्याची बातमी समोर आली आहे.















