न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात देखील रोज करोनाचे रुग्ण समोर येत आहेत.
त्यातच कोंढवा येथील ६१ वर्षीय आजोबांमुळे ३ वर्षीय नातीला करोनाची बाधा झाल्याची माहिती अहवालात समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पुण्यात एकाच दिवसात सात रुग्ण बाधित आढळले आहेत.
महाराष्ट्रात करोनाचे ४१६ रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात आज एकाच दिवसात सात रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या ४६ पोहोचली आहे. यापैकी ९ जण करोना मुक्त झाले आहेत. गुरुवारी ससून रूग्णालयात ४५ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात करोनाचा हा दुसरा बळी ठरला आहे.












