- इतर परिसरातील दुकानांना हे बंधन नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- करोना’चे अधिक रुग्ण आढळलेलले काही भाग महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. याच भागात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने निश्चित करुन दिलेल्या वेळेत उघडण्यात येतील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त शहरातील इतर भागांमध्ये किराणा दुकानांना वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही. शहरात सील केलेल्या भागामध्ये सकाळी ८ ते ११ या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
सील केलेल्या भागांशिवाय अन्यत्र किराणा दुकाने किंवा दुध विक्री बंद ठेवण्याबाबत त्यांच्या कोणत्याही सूचना नाही. तरीही, शहरातील काही प्रमुख भागांमध्ये किराणा दुकाने, दूध डेअरी ही ठराविक वेळेतच सुरू ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.


















