न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- ड्रम नेल्याच्या किरकोळ कारणावरून सात जणांनी मिळून वाहनांची तोडफोड केली. तसेच, एकावर कोयत्याने वारही केले. ही घटना रविवारी (दि. १२) पहाटे दोनच्या सुमारास बौद्धनगर, पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी स्वप्निल सोनवणे (३०, रा. बौद्धनगर) यांनी सोमवारी (दि. १३) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार छोटा रावण ( वय २५ ), चांद ( वय २२) आणि त्यांचे तीन ते चार साथीदार व यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी छोटा रावण याने फिर्यादीचा ड्रम नेला. याबाबत फिर्यादींनी त्याला विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या साथीदारांसह फिर्यादी यांना दांडके आणि कोयत्याने मारून जखमी केले. आम्ही इथले भाई आहोत, कोणी घराच्या बाहेर आला तर त्याला खल्लास करून टाकीन, असे धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.












