न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्याचे आदेश दिले होते. शहरातील सर्वच भाजी मंडई बंद असताना पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत काही दुकानदारांनी त्यांचे दुकाने सुरू ठेवून नागरिकांची गर्दी जमवली.
बुधवारी पहाटेपासून नागरिकांनी भाजी घेण्यासाठी गर्दी केली. पोलिसांनी पिंपरी भाजी मंडईतील गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी जादा प्रमाणात होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास वाव मिळाला. त्यामुळे पिंपरी पोलिसांनी सुनील हिरामण कुदळे, महेश बाळासाहेब घरद, ज्ञानेश्वर तुकाराम तापकीर या तीन दुकानदारांना नोटीस बजावली आहे.
त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १८८, २६९, २७०, २९० तसेच महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना २०२० चे कलम ११, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब, साथरोग प्रतिबंधक कायदा कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.













