- बुधवार/शुक्रवार/रविवार सोडून इतर दिवशी दुकानं राहणार बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या Covid 19 या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव प्रस्तावित केलेल्या विविध उपाय योजनांची अंमलबजावणी या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
त्यामुळे साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ (एपिडमिक अक्ट) मधील तरतुदीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील सर्व चिकन/मटण दुकाने दि. २०/०४/२०२० पासून बुधवार/शुक्रवार/ रविवार सोडून इतर दिवशी पुढील आदेश होई पर्यंत बंद करणेत येत आहे. कॉन्टेमेंट एरिया/ बॅरिगेटींग एरिया यामधील चिकन/मटण दुकाने पुर्णत: बंद राहतील. त्यानुसार सदर भागातील संबंधित पोलीस स्टेशन प्रमुख सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करतील.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरात रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे.
अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई ४००००१ दि.१४ मार्च २०२० क्र करोना २०२०/प्र.क्र.५८/आरोग्य ५ “महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम,२०२०” नुसार एखादया भौगोलिक क्षेत्र उदाहरणार्थ गाव, तालुका, वॉर्ड कॉलनी इत्यादी मध्ये कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव/ उद्रेक आढळयास अशा उद्रेकजन्य क्षेत्राबाबत खाली नमूद केलेल्या तसेच प्रसंगानुसार आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त समक्ष प्राधिकारी असतील अशा भौगलिक क्षेत्रांच्या बाबतीत क्र.१० मधील
तसेच भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ प्रमाणे संभाव्य होणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव आहे. याकरीता क्षेत्र प्रतिबंधित करणे, क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधित करणे क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करणे याबबत संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे महापालिकेचे अति. आयुक्त २ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.













