न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पुरस्कृत व आई निर्मिती संस्था आयोजित ‘निसर्ग संवर्धन काळाची गरज’ या विषयांतर्गत २ मिनटांची व्हिडिओ स्वरूपात, १५ वर्षा खालील बालमित्रांसाठी (मुले/मुली) वक्तृत्व स्पर्धा असणार आहे.
“निसर्ग आपला नातेवाईक आहे. आणि त्याला सोडून आपण जे काही करत आहोत त्याचेच परिणाम आपण कोरोना जन्य परीस्थितीतुन भोगत आहोत. तर बालमित्रांनो निसर्ग संवर्धनासाठी, निसर्ग आपला नातेवाईक मानुन स्पर्धेसाठी आपल्या कलाकृती पाठवा” असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे.
कवीता, नाटक, गीत, निबंध, विनोद यापैकी कोणत्याही एका प्रकारात आपल्या कलाकृती 9226789883 या नंबरवर व्हॉट्स ॲप द्वारे किंवा aainirmiteesanstha@gmail.com या ठिकाणी मेल द्वारे पाठवा. 20 एप्रिल पर्यंत पाठवायचे आहे. भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश, अटी व नियमांसाठी वरील दिलेल्या नंबरवर किंवा मेल एड्रेस वर चौकशी करा, असे आव्हान आयोजकांनी केले आहे.













