न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- सध्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना या जीवघेण्या आजराचे थैमान सुरु आहे. याला आपला महाराष्ट्रही अपवाद नाही. कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लोकडाउन सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. कुणालाही घराच्या बाहेर जाता येत नाही. उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अशा परिस्थितीत शासनाकडून रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात तसेच मोफत धान्य देऊ केले आहे. मात्र, रेशनकार्ड लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना हे धान्य देण्यास रेशन दुकानदार मनाई करीत आहेत. त्यामुळे कुणीही उपाशी राहू नये, या हेतूने सरकाने पाठविलेला धान्य रेशनकार्ड धारकांना मिळत नाही.
या बाबत सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब थोरात यांनी भोसरी परीमंडळ विभागातील परिमंडळ अधिकारी नागनाथ भोसले यांना भोसरी मतदारसंघातील ऑनलाईन नोंद नसलेल्या रेशनकार्ड धारकांना, रेशनकार्ड लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांची तांत्रिक कारणांवरून अडवणूक न करता, त्यांना शासनाने मान्य केलेला धान्याच्या कोट्यातून त्वरित राशन द्यावे, अशी मागणी केली आहे.













