- भारतात प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे आवश्यक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२०) :- करोनाची कुठलीही लक्षणे आढळून न आलेल्या व्यक्तींकडून चीनमध्ये ४४ टक्के नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली. चीनमध्ये एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
करोनाची लागण झाल्यानंतर ती लक्षणे दिसून येण्याच्या दोन ते तीन दिवस आधी एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये करोना व्हायरसचे संक्रमण होते असा चिनी अभ्यासकांचा अंदाज आहे. १५ एप्रिलला नेचर मेडिसीनमध्ये हा स्टडी रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे.
चिनी अभ्याकांचा हा निष्कर्ष निश्चित विचार करायला भाग पाडणार आहे. कारण करोना व्हायरसची लक्षणे आढळून आली तरच चाचणी करण्याची भारताची सध्याची रणनिती आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार आहे.













