- तर, राज्यात सर्वाधिक मृत्युदर असणारा जिल्हा पुणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२०) :- देशातील सर्वात जास्त करोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्या तीन हजारांच्या पुढे गेली. तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण असणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरलं आहे. सोबतच मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे.
गुरुवारी राज्यात २८६ करोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढलळल्याने संख्या ३२०२ वर पोहोचली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९४ झाली आहे. तर, राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा सर्वाधिक दर पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्य़ात बुधवारी संध्याकाळपर्यंत ४२७ रुग्णांची नोंद झाली, त्यांपैकी ४३ रुग्णांचा या आजारात मृत्यू झाला. त्यामुळे पुण्याचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक म्हणजे, १०.०७ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.













