- पहा…. आठवडी बाजारातील ठिकाणं आणि आयोजकांची नावे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना (कोवीड १९) साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई, आठवडी बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस पूर्णत: प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्याची अंमलबजावणी शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत करण्यात आली होती.
त्यानंतर हा आदेश शिथिल करीत शहरातील सात ठिकाणी पहिल्या टप्यात भाजीपाला व फळविक्रीस महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आज शुक्रवारी (दि. १७) रोजी शहरातील १६ ठिकाणी आठवडी बाजारास आयुक्तांनी काही अटी आणि शर्थीवर परवानगी दिलेली आहे.
आठवडी बाजारातील ठिकाणं आणि आयोजकांची नावे :-
- केशवनगर, चिंचवड – निलेश रायकर
- नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपरी वाघेरे – निलेश रायकर
- से . नं . २९ , राधेय हाईट शेजारी, रावेत – निलेश रायकर
- ड क्षेत्रिय कार्यालयाशेजारी, काळेवाडी फाटा, वाकड – महेश फरगडे
- पिपळे निलख बसस्टॅन्ड शेजारी, मनपाचे मोकळे मैदान – मयुर पवार
- स. नं. ४ / पी. १३२ / १, शिवशंभो उद्यान, संभाजीनगर – महेश फरगडे
- से. नं. २६, मनपा जलतरण तलाव, निगडी प्राधिकरण – निलेश रायकर
- मुबई – पुणे रस्ता, मेहता हॉस्पीटल जवळ, काळभोरनगर, चिंचवड – निलेश रायकर
- कुस्ती मैदान, ११ नंबर बसस्टॉपजवळ – निलेश रायकर
- प्रभाग क्र. १४, स. नं. ४४८७, आ. क्र. २६८, आकुर्डी – निलेश रायकर
- प्र. क्र. ३० स. नं. ४९७ / २ अ. क्र. ३२, कासारवाडी – निलेश रायकर
- अहिल्यादेवी शाळा मैदान, जुनी सांगवी – मयुर पवार
- सम्राट चौक, मोरवाडी, पिंपरी – मयुर पवार
- प्रबोधनकार ठाकरे मैदान, यमुनानगर – अमित जायगुडे
- शंकरराव मासुळकर मंडई शेजारी, तुळजाभवानी मंदिर, मासुळकर कॉलनी – अमित जायगुडे
- पीसीएमसी मैदान, रोझ इस्कॉन जवळ, पिंपळे सौदागर – अमित जायगुडे
आठवडे बाजारातील अटी आणि शर्थी पुढीलप्रमाणे :-
१ ) प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर देणेत यावेत.
२ ) सॅनिटायझर टनेलचा वापर करावा.
३ ) कोरोना कोवीड प्रादुर्भाव रोखणेकामी क्षेत्रिय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली सर्वतोपरी काळजी घेणेत यावी.
४ ) आठवडे बाजार मध्ये एकाच ठिकाणी गर्दी करू नये.
५ ) सोशल डिस्टंसिगचे पालन करणे बंधनकार आहे.
६ ) आठवडे बाजार मध्ये येताना चेहरा झाकने अथवा मास्क बापरणे बंधनकारक आहे.
७ ) आठवडे बाजारमध्ये येताना व परत गेल्यावर हात स्वच्छ धुवावेत अथवा सनेटाईज करणे आवश्यक आहे.
८ ) आठवडे बाजार मध्ये ६५ वर्षे पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनी व ५ वर्षे पेक्षा कमी वयाच्या मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रवेश वर्जित आहे.
९ ) आठवडे बाजारमध्ये अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुकंने हा दंडणीय गुन्हा आहे.
१० ) आठवडे बाजारमध्ये व परीसरात दारू पिण्यास अथवा दारू पिऊन प्रवेश करण्यास मनाई आहे.
११ ) आठवडे बाजारमध्ये व परीसरात गुटखा खाण्यास अथवा गुटखा खाऊन प्रवेश करण्यास मनाई आहे.
१२) ग्राहकास भाजीपाल्यास हात लावू देऊ नये.
१३ ) गाळेधारकांनी स्वतः सेनिटायझरचा वापर करावा
१४ ) ग्राहकांना बाजारात प्रवेश करताना सेनिटायझरचा वापर व मास्क असेल, सोशल डिस्टसिंगमध्ये असेल. तरच भाजीपाला, फळे व इतर माल द्यावा.
नागरिकांनी कोरोना विषाणु संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना म्हणुन शेतकरी आठवडे बाजारामधील, स्टॉल मधील ३ / ४ फुटाचे अंतर राखणेबाबत दक्षता घ्यावी.













