न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेणाऱ्या दिल्लीतील तबलीगी जमातीच्या कार्यक्रमातून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
त्या रुग्णाचे घशातील स्वेब पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यात त्या रुग्णाचे २४ तासातील दोनही ‘रिपोर्ट निगेटीव्ह’ आले आहेत. रुग्णाची प्रकृती पाहून त्याला आज घरी सोडण्यात आले आहे. तर वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात दाखल १२८ रुग्णांचे रिपोर्ट आज निगेटिव्ह आलेले आहेत.
शहरातील करोना बाधितांची संख्या ५२ वर पोहचली असून ३५ रुग्णांवर पिंपरी-चिंचवड शहरातील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर, चार कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि. ९) रोजी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.


















