न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२०) :- सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून देशभरात लॉकडाउन सुरू आहे. जे की ३ मे पर्यंत राहणार आहे. या लॉकडाउनमुळे सर्व बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक, व्यावसायिक हालचाली बंद आहेत.
संचारबंदीत शहरातील काही भागातील नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तो वाढू नये म्हणून बजाज ऑटोकडून शहरात बिट मार्शलची गस्त वाढविण्यासाठी २९ दुचाकी पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या आहेत.


















