- अॅड. राजेश पुणेकर यांची सह. जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिका-यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने दि. २३ मार्च २०२० पासून शासनाच्या आदेशाप्रमाणे दुय्यम निबंधक कार्याल व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद असल्याने एडीएम दस्ताची मुदत व मुद्रांक शुल्काची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी अॅड. राजेश पुणेकर यांनी सह. जिल्हा निबंधक वर्ग – १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने दि. २३ मार्च २०२० पासून शासनाचे आदेशाप्रमाणे दुय्यम निबंधक कार्याल व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक कार्याल व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद होणार असल्याबाबत कोणासही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद होण्यापूर्वी एडीएम ठेवलेल्या दस्ताची मुदत जेवढया कालावधीकरिता दस्त नोंदणी प्रक्रिया बंद आहे, तेवढया कालावधीकरिता वाढविण्यात यावी.
तसेच दुय्यम निबंधक कार्याल व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद होण्यापूर्वी ज्या दस्तास पक्षकारांनी मुद्रांकशुल्क व नोंदणी फी भरलेली आहे व दस्त नोंदविले गेले नाहीत, त्याची देखील दस्त नोंदणी प्रक्रिया बंद आहे. तेवढया कालावधीकरिता वाढविण्यात यावी. अन्यत: पक्षकारांचे, मुद्रांक खरेदी घेतलेल्या नागरिकांचे न भरून येणारे नुकसान होईल व सदर बाब अन्यायकारक ठरेल.
सदर निवेदनाद्वारे अॅड. राजेश पुणेकर यांनी अशी देखील विनंती केली आहे कि, बरेच दिवस दुय्यम निबंधक कार्याल व दस्त नोंदणी प्रक्रिया बंद असल्याने कार्यालय चालू झाल्यानंतर दस्ताची गर्दी वाढू शकते व कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये दस्त नोंदवून पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांची कामकाजाची वेळ दोन तासांनी वाढवून मिळणे गरजेचे आहे, असे या निवेदनात अॅड. पुणेकर यांनी म्हटले आहे.


















