न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- कोरोना संकटामुळे हातावर पोट असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील हजारो नागरिकांवर मदतीसाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. या नागरिकांना त्यांच्याच भागात मदत होणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवडमधील एकही नागरिक उपाशी झोपता कामा नये, यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपले सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे, अशी प्रत्येक नगरसेवकाची भावना आहे.
त्यामुळे महापालिकेने शहराच्या प्रत्येक भागातील नागरिकांना पुरेसे धान्य मिळावे, यासाठी महापालिकेच्या ३२ प्रभागांमध्ये नगरसेवकाला ५ लाख रुपयांचे धान्य खरेदी करून द्यावे. त्यासाठी येणाऱ्या खर्चाला स्थायी समितीची मान्यता घेण्यात यावी. तसा प्रस्ताव तातडीने स्थायी समिती सभेपुढे ठेवून त्याला मंजुरी घेण्यात यावी, अशी सूचना महापौर माई ढोरे, पक्षनेते ढाके, व माजी पक्षनेते पवार यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे.


















