न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांना ५ लाख रुपयांचे धान्य खरेदी करून द्यावे. जेणेकरून ते त्या संबंधित प्रभागातील गरजू नागरिकांना धान्याचे वाटप करतील. अशी सूचना महापौर माई ढोरे, पक्षनेते ढाके, व माजी पक्षनेते पवार यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
मात्र, महापालिकेच्या क्षेत्रनिहाय भागात स्वीकृत नगरसदस्य देखील येतात. त्यांचा देखील या योजनेत समावेश करावा, अशी मागणी फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.


















