न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- थेरगाव येथील समर्थ कॉलनीत तरुणी गुरूवारी रात्री साडेआठ वाजता घराबाहेर बॅडमिंटन खेळत होती. त्यावेळी आरोपी होनाजी घोगरे याने तिला ‘तु घरात जा नाहीतर तुझ्या कानाखाली मारेल’, अशी धमकी दिली.
फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर इतर आरोपींनी तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिचा विनयभंग केला. होनाजी किसन घोगरे (वय ४६), जनाबाई होनाजी घोगरे (वय ३६), प्रथमेश होनाजी घोगरे (वय १८), आरती कानिफनाथ घोगरे (वय ४४), कानिफनाथ घोगरे (सर्व रा. समर्थ कॉलनी, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















