- संतापजनक.. शहराच्या कोरोनाबाधीतांनी केली साठी पार; तब्बल सात रुग्णांची भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेणाऱ्या दिल्लीतील तबलीगी जमातीच्या कार्यक्रमातून आलेल्या आणखी दोन कोरोना बाधित रुग्णांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
या रुग्णांचे घशातील स्वेब पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यात त्या रुग्णांचे २४ तासातील दोनही ‘रिपोर्ट निगेटीव्ह’ आले आहेत. आज शनिवारी त्या रुग्णांची प्रकृती पाहून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.
तर, आज आणखी भीतीदायक घटना घडली असून, तब्बल सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ६१ वर पोहचली असून, एकूण १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यात पुरुष – ४ ( वय – १२, ३५, ३८ व २१ वर्षे) तर स्त्री रुग्ण ३ ( वय १०, ३० व १२ वर्षे ) अशी आहेत. हे सर्व रुग्ण रुपीनगर, संभाजीनगर, चऱ्होली परिसरातील आहेत. त्यामुळे आज रात्री अकरा नंतर हा सर्व परिसर पोलिसांकडून सील करण्यात येणार आहे.
पैकी पी. सी. एम. सी. हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात पुर्वी दाखल रुग्ण संख्या १ आहे. तर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील रहिवासी परंतु पि. चिं. म. न. पा. क्षेत्राबाहेरील रुग्णालयात दाखल रुग्ण संख्या ०६ तर, पुणे जिल्हा बाहेरील रुग्णालयात दाखल परंतु रहिवास पत्ता पिं. चिं. म. न. पा. कार्यक्षेत्रातील संख्या १ आहे. तर महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ३८ रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहून रुग्ण संख्येला आवर घालायची गरज निर्माण होत आहे.


















