न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- महाराष्ट्रात ३२८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ३६४८ इतकी झाली आहे. ३२८ पैकी सर्वाधिक म्हणजे १८४ रुग्ण फक्त मुंबईत आढळले आहेत. तर पुण्यात ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची वाढती संख्या ही नक्कीच चिंतेची बाब आहे. मात्र महाराष्ट्रात करोनाच्या चाचण्याही सर्वाधिक झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसंख्या वाढते आहे अशी माहिती याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


















