न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूचा शहरात प्रादुर्भाव वाढत आहे. थेरगाव परिसरात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे.
काळेवाडी आणि पिंपरी या दोन गावांना जोडणारा पवना नदीवरील पवनेश्वर पूल हा सार्वजनिक वाहतुकीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे. या आदेशातून अग्निशमन विभाग, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, वैद्यकीय विभागाची वाहने यांना वगळण्यात आले आहे, याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.


















