न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील दोन रुग्णांना शुक्रवारी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात करोना संशयित म्हणून आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते.
या दोन्ही रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला. त्यामध्ये खराळवाडीतील ५५ वर्षीय पुरुषाचा, तर सध्या शहरात राहणाऱ्या मात्र मूळच्या रायगड येथील ८० वर्षीय वद्धेचा समावेश आहे.
मृत दोन्ही रुग्णांची चाचणी करोना निगेटिव्ह आली होती, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. हे दोन्ही रुग्ण कोरोना निगेटिव्ह होते तर, त्यांना इतर उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात का हलविण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णालय प्रशासनाचे माहिती लपविण्याचे गौडबंगाल तर नसेल ना, असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.


















