न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२०) :- सध्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना या जीवघेण्या आजराचे थैमान सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लोकडाउन सुरु आहे. याला आपले पिंपरी चिंचवड शहरही अपवाद नाही.
अशा परिस्थितीत शासनाने रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात तसेच मोफत धान्य देऊ केले आहे. मात्र, ज्यांच्याकडे गावाकडील रेशनकार्ड आहे, बंद पडलेले आहे, आधार लिंक नाही तर काही जणांकडे रेशनकार्डच नाही, अशा नागरिकांना हे धान्य देण्यास रेशन दुकानदार मनाई करीत आहेत.
त्यामुळे कुणीही उपाशी राहू नये, या हेतूने सरकाने पाठविलेले धान्य रेशनकार्ड धारकांना मिळत नाही. अशां नागरिकांनाही शासनाने अन्नधान्य रेशन दुकानावर उपलब्ध करावे, अशी मागणी समाजसेविका माधुरी जलमुलवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे.


















