न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेणाऱ्या आणखी दोन कोरोना बाधित रुग्णांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
या रुग्णांचे घशातील स्वेब पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यात त्या रुग्णांचे २४ तासातील दोनही ‘रिपोर्ट निगेटीव्ह’ आले आहेत. आज रविवारी त्या रुग्णांची प्रकृती पाहून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान शहरातील करोना बाधितांची संख्या ६२ वर पोहचली असून, सक्रीय रुग्णांची संख्या ४६ वर गेली आहे. एकूण १७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ३७ रुग्ण दाखल आहेत.


















