- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पोहोचली १८ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात एकीकडे दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि दुसरीकडे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा १४ दिवसांचा कालावधी संपल्याने त्या महिलेचे घशातील द्रव पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात ते निगेटिव्ह आले. त्या नंतरचा २४ तासातील रिपोर्ट देखील निगेटिव्ह आल्याने त्या महिलेला आज सोमवारी (दि. २०) रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही महिला दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लीगी मर्कज रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील होती.
दरम्यान शहरातील करोना बाधितांची संख्या ६२ वर पोहचली असून, सक्रीय रुग्णांची संख्या ४६ वर गेली आहे. एकूण १८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.


















