न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रस्ते, रुग्णालय, बाजारपेठ, शासकीय कार्यालये सर्व परिसरामध्ये वावरताना मास्क परिधान न करणा-या व्यक्तींविरुध्द र. रु. ५०० /- इतक्या रकमेचा दंड आकारण्यास महापालिका आयुक्त यांनी मान्यता दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करित नसल्याचे आढळत आहे. तथापि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सामाजिक अंतर पाळण्याबरोबरच मास्क परिधान करणे क्रमप्राप्त असून सर्व नागरिकांनी सक्तीने त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूच्या होणा-या संसर्गास आळा घालणेकामी मास्क परिधान न करणा-या नागरिकांविरुध्द ५००/- रुपये एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आहे.













