न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती वाकड येथून पिंपळे निलखच्या दिशेने एका मोपेड दुचाकीवरून अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे. यावरून पोलिसांनी मानकर चौकात सापळा रचून बेरा याला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीवर तीन बॉक्स दारूचे आढळून आले. ही कारवाई सोमवारी (दि. २०) रोजी करण्यात आली.
पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बादल भुपती बेरा (वय ३३, रा. शेडगे वस्ती, औंध हिंजवडी रोड, वाकड) याच्याविरोधात साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २, ३ व ४, भारतीय दंड विधान कलम २६९, १८८ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे.












