न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ८९६ झाली आहे. विभागातील १३५ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ७०० आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
पुणे जिल्ह्यात ८१३ रुग्ण बाधित असून आजपर्यंत ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा १६ तर मृत्यू २, सोलापूर ३० तर ३ मृत्यू, सांगलीत २७ तर १ मृत्यू, कोल्हापूर १० रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे पुणे विभागात एकुण ८९६ रुग्ण कोरोनाबाधित असून ६१ मृत्यू झाले आहेत.
आजपर्यत पुणे विभागामध्ये एकुण १०७१७ नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते. त्यापैकी १०२१० चा अहवाल प्राप्त आहे. ५०७ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ९२६४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ८९६ रुग्णांचा अहवाल पॉजिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील ४५,८६,६१२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत १,७६,३६,६७३ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ८६५ व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.


















