न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२०) :- करोनाबाधितांमध्ये मंगळवारी पुण्यातील दोन पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी एकजण कावेरीनगर (वाकड) पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास आहे.
याबाबत पुण्यातील “त्या’ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी यास दुजोरा दिला आहे. तसेच वाकडमधील स्थानिक नगरसेवकाने याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेस कळविले आहे. यामुळे कावेरीनगर पोलीस वसाहतीमधील एक इमारत सील केली आहे.


















