- केशरी कार्डधारकांची यादी ना पुरवठा कार्यालयाकडे ना दुकानदारांकडे, अंमलबजावणी कशी करायची – माजी खासदार बाबर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२०) :- केशरी रेशनकार्डधारकांना येत्या मे महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात गहू व तांदूळ मिळणार आहे. सद्य: स्थितीत स्वस्त धान्य दुकाने ठराविक वेळेपर्यंत चालू आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकाने ही १२ तास उघडी ठेवा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अंत्योद्य आणि अन्नसुरक्षा योजनेतील त कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे हे नागरिकच धान्य घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये येत आहेत. शासनाने सर्व केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने मे व जून महिन्याचे धान्याचा निर्णय घेतला आहे.
एक मे पासून धान्याचे वितरण केले जाणार आहे. सध्या सर्व स्वस्त धान्य दुकाने ठराविक वेळेतच उघडी आहेत. मे महिन्यापासून केशरी शिधापत्रिकाधारकांना सुध्दा धान्य मिळणार असल्याने स्वस्त धान्य दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकाने १२ तास उघडी ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.
केंद्र व राज्य शासनाने राज्यातील सर्व केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने मे व जून महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या योजनेचे अजून चलनच भरलेले नाही, पैसे भरले नाहीत. त्यामुळे येत्या २५ तारखेपासून याची अंमलबजावणी होणार कशी. तसेच हे राशन केशरी कार्डधारकांना कसे वाटायचे, कारण केशरी कार्डधारकांची यादी धान्य पुरवठा कार्यालयाकडे नाही. तसेच गेल्या पाच वर्षांपासून कार्ड बंद झाल्यामुळे कुठल्याच दुकानदारांकडे ही यादी नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच संभ्रमावस्था वाढणार आहे.
– गजानन बाबर, माजी खासदार तथा अध्यक्ष, ऑल इंडिया शॉपकीपर फेडरेशन


















