न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज नव्याने आणखी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. एका २६ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. हा रुग्ण रुपीनगर परिसरातील आहे.
दरम्यान शहरातील करोना बाधितांची संख्या ६८ वर पोहचली असून, सक्रीय रुग्णांची संख्या ४८ वर गेली आहे. एकूण २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ३७ रुग्ण दाखल आहेत.


















