- स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांचा महापालिकेकडे पाठपुरावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२०) :- चिखली-कुदळवाडीतील प्रभाग ११ मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ‘फ’ प्रभागाचे स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी आरोग्य विभागाकडे केली होती.
याची दखल घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. सुनिता साळवी, डॉ गोरख कर्पे यांनी कुदळवाडीत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी सुरु केली.
गेल्या दोन दिवसात दोन हजार नागरिकांची तपासणी पुर्ण झाली आहे. सहकार्य करीत नसलेल्या नागरिकांची देखील समजूत काढून त्यांचीदेखील तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती दिनेश यादव यांनी दिली.


















