तर, निगडीतील ओटास्कीममधील एका जेष्ठाचा कोरोनामुळे मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज नव्याने शहरात आणखी १२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सात पुरुष आणि दोन लहान मुली आणि तीन महिलांच समावेश आहे.
पुरुषांचे वय अनुक्रमे १८, २२, २४, २६, २८, ३५, ६० अशी आहेत तर, महिलांचे वय अनुक्रमे ३, ३, २०, २६, २८ अशी आहेत. अहवाल सकारात्मक आलेले हे सर्व रुग्ण रुपीनगर मधील कोयनानगर या परिसरात राहणारे आहेत.
तसेच, आज एका कोरोनाबाधित जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून, हा रुग्ण निगडीतील ओटास्कीम परिसरात रहात होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरातील मृत रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे.
दरम्यान शहरातील करोना बाधितांची संख्या ८१ वर पोहचली असून, सक्रीय रुग्णांची संख्या ६० वर गेली आहे. एकूण २१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ४८ रुग्ण दाखल आहेत. आज दाखल रुग्णांवर महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.















