न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक बेघरांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडविण्या साठी भोसरीतील आपत्ती व्यवस्थापन संघ, पुणे पुढे सरसावले असून, त्यांना नियमित भोजन पुरविण्याची व्यवस्था ते करीत आहेत. परिसरात अनेक बेघर, गरीब नागरिक रस्त्यांवर वास्तव्य करतात; तसेच लॉकडाऊनमुळे बाहेरील जिल्ह्यांतील, राज्यातील अनेक मजूर कुटुंबे शहरात अडकून पडलेली आहेत. या संकटाच्या काळात त्यांनी उपाशी राहू नये म्हणून अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना दोन वेळचे अन्न पुरवठा करण्याची जबाबदारी यांनी घेतली आहे. २५० ते ३०० लोकांना नियमित अन्न व पाणी पोच करून ते सामाजिक बांधिलकी पार पाडत आहेत.
कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागलाय. अशा कठीण प्रसंगात आपण त्यांना एकटे सोडून, उपाशी मरण्यासाठी सोडून चालणार नाही त्यामुळे हे सदस्य मिळून रोज एका परिसरातील कुत्री व मांजरे याना अन्न, बिस्किटे देण्याची व्यवस्था करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी भोसरीतील शांतीनगर भागातील परप्रांतीय कामगारांना मागील मार्च महिन्यात १० किलो गहू व १० किलो तांदूळ नेऊन दिला होता. त्यांचे अमेरिकेतील जवळचे मित्र श्रीहरी हल्लूर यांनी पाठविलेल्या मदतीतून गुरुवारी २३ एप्रिलला भोसरीतील या शाळेत राहत असलेल्या व बाहेरून जेवण घेण्यासाठी रोज येत असलेल्या सुमारे २००-२५० लोकांना तसेच पोलिसांना केळी, बिस्किटे, सॅनिटायझर यांचे वाटप छत्रपती शिवाजी शाळा परिसरात केले गेले. गणेश म्हस्के यांनीही काही दिवसांपूर्वी या शाळेत दोनदा अन्नदान केले होते.
शाळेत सुमारे १०० जणांच्या राहण्याची सोय पिंपरी पालिकेने केली आहे. तहसीलदार यांनीही भेट देऊन काही दिवसांपूर्वी याचे कौतुक केले व या कार्यकर्त्यांना पास दिले. येथे दुपारी इस्कॉन कडून व रात्री Resque टीमकडून मिळणारा मसालाभात या लोकांना तसेच बाहेरून येणाऱ्या १००-१५० अश्या एकूण २००-२५० जणांना दिला जातो. RESQ ही आपत्ती व्यवस्थापन करणारी टीम गेल्या काही आठवड्यापासून रोज ही मदत करते आहे. श्रीहरी हल्लूर मुळे या सर्वांना जेवणाबरोबर केळीही मिळाली तसेच भुकेल्या कुत्र्यांनाही असंख्य बिस्किटे मिळाली.
विजय लांडे, संतोष शेलार, अब्दुल अहमद, संदीप गव्हाणे, करिम सय्यद, सचिन निकम, दिलीप गायकवाड, विकास गावडे हे कार्यकर्ते यात मदत करत आहेत. इच्छूक दात्याना आवाहन आहे की त्यांनी मसालाभात, केळी इ. आणून दिल्यास या गरिबांना गरजेची मदत या कठीण काळात होईल. मदतीसाठी संपर्क विजय लांडे – 9822045145, संतोष शेलार – 8087999980.















