न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात देखील ३ मे पर्यंत वाढविलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या समस्यात आणखीनच वाढ झाली. शहरातील विविध संस्था या गोरगरीब नागरिकांच्या मदतीला सरसावल्या आहेत. यात शहरातील गणेश मंडळे देखील पुढे आहेत.
काळेवाडी परिसरातील तापकीरनगर येथील जय भवानी मित्र मंडळातील सभासदांनी स्व:खर्चातुन परीस कॉलनी १, २, व ३ येथील गरजु कुटुंबाना मंडळाच्या वतीने अन्नधान्याचे वाटप केले. यावेळी नागरिकांनी मंडळाचे आभार मानले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय जराड, सदस्य रोहन कांबळे, संदेश पारकर, महेश तावरे, स्वप्नील नवथरे, संतोष जराड, गणेश वाबळे, अम्रूत यादव, स्वराज झाडे, केतन शिरसाठ, यादव कवितके, नाना म्हस्के, शाहुल वाघमारे, सागर वाघमारे, महेश डोंगरे, सतिष गुप्ता, दलबिर सिंग सोहंती आदींनी परिश्रम घेतले.


















