- शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा – दीपक मोढवे पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- कोरोनामुळे देशासह राज्यातील ग्रामीण भाग होरपळून निघत आहे. हातावरील पोट असलेले गोरगरीब लोकं मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री सुरेश अण्णा धस यांच्या सूचनेनुसार आष्टी तालुक्यातील खुंटेफळ (वाटेफळ) गावात येथील मोढवे पाटील कुटुंबातर्फे मदतीचा एक छोटासा प्रयत्न म्हणून, गावातील प्रत्येक घराला पाच किलो साखरेचे वाटप करण्यात आले.
या सोशल डिस्टंसिंग व मास्क परिधान करून, गावात साखरेचे वाटप करण्यात आले. मुख्यत्व म्हणजे गावातील गोरगरीब ग्रामस्थांना ही छोटीशी मदत उपयोगी पडणार आहे.
याकामी आमदार सुरेश अण्णा धस मित्र परिवार व मोढवे (पाटील) परिवाराने परिश्रम घेतले आहेत. लोकांनी लॉकडाऊन च्या कालावधीत घराबाहेर पडू नये, शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामस्थ तथा पिंपरी चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी केले आहे.


















