न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या तीन मे रोजी संपणार आहे. पण मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
मुंबई, पुण्यामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरात १८ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी लाइव्ह मिंटशी बोलताना ही माहिती दिली.
“करोना व्हायरसचा फैलाव रोखणे हा लॉकडाउन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. पण त्यांचा फैलाव कमी होत नसेल तर आम्हाला लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल” असे टोपे फोनवरुन लाइव्ह मिंटशी बोलताना म्हणाले.


















