न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात मास्कचा वापर न करणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. त्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे.
‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिका-यांनी मास्कचा वापर न करणा-या १६ जणांवर शुक्रवारी दंडात्मक कारवाई करीत प्रत्येकी ५०० प्रमाणे आठ हजार रुपये दंड वसूल केला आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक २४ मधील डांगे चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली.


















