न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना कोरोना आजार व लॉकडाउनमुळे नैराश्य व गोंधळलेली स्थिती किंवा भीती व चिंता याबाबत माहिती व समुपदेशन/ मार्गदर्शन केंद्र पदव्युत्तर संस्था वाय. सी एम हॉस्पिटलच्या मानसशास्त्र विभागा मार्फत सुरू करण्यात आले आहे.
या केंद्रात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईक व इतर नागरिक यांना करोनाबाबत माहिती व मार्गदर्शन, समुपदेशन व मानसिक आधार तसेच आनुषंगिक मदत देण्यासाठी रुग्णालयातील प्रदीर्घ अनुभव असलेले कार्यरत वैद्यकीय व मनोसामाजीक समाजसेवक यांच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिष्ठाता डॉ राजेंद्र वाबळे व सर्व प्रशासन याकामी प्रभावीपणे सक्षम सेवा देण्यास सज्ज झाले आहे. याकामी वैद्यकीय समाजसेवक बोत्रे, आमले, गायकवाड, ढवळे व सुवर्णकार व मनोसामाजीक समाज सेवक जुंकटवार या केंद्राचे कामकाज पाहत असून, रुग्णालय स्थित रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेचे एम ए हुसेन देखील विशेष सेवा देण्यास तत्पर आहेत. तसेच अधिक माहिती करिता 02067332297 या संपर्क क्रमांकावर नागरिक माहिती घेऊ शकतील.


















